छत्रपती शाहू यांचे पेशवे त्यांच्या आमदनीचा तो काळ.सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवे, पेठवडगाव, इस्लामपूर, आष्टा यांच्या बेचक्यातील गाव म्हणजे बहादुरवाडी.गावतसं टुमदारच. शंभर-एक उंबरा असावा त्याकाळी.जवळून वाहणारी वारणा नदी. नदी मुळं त्यो परिसर हिरवळीने नटलेला.गाव तस देशमुखी इनामाच.आणि ह्या देशमुखी वतनाचे सरदार म्हणजे महिपतराव घोरपडे.” महिपतराव ” ही घोरपडे घराण्याला मिळालेली पदवी. म्हणजे जसं जावळीकर मोरे यांच्याकडे “चंद्रराव” ही पदवी तशी ही महिपतराव ही घोरपडे घराण्याकडे पदवी होती.त्याकाळी घोरपडे सरकारांनी गावात गढी वजा मोठा वाडा बांधलेला.
विजापूरच्या आदिलशाहीचा ४०,००० होनांचा लुटलेला गेलेला खजिना माहिपतराव यांनी भरून देऊन देशमुखी व ९.२५( सव्वानऊ ) चावर म्हणजे सुमारे १२० बिघे इतक्या रानाची सनद मिळवली होती. हे सगळे हक्क मिळवून महिपतरावांनी वर सांगितलेल्या प्रमाणे चांगला गाव वशिवला.
गावाभवती टोलेजंग तटबंदी टाकली मोठी कमानदार वेस बांधली
आणि हे सगळे विकासात्मक आणि बचावात्मक उपाय झाल्यावर रावांनी गावाला नवीन नाव ध्याच ठरवलं. आता गाव नवीन असल्यामुळे नाव पण जोकदार पाहिजे होतं.बऱ्याच विचार अंती रावांनी ” बहादूरबिंडा ” हे नाव निश्चिंत केलं.पण पुढे-पुढे जसा काळ लोटला तस त्या बहादूरबिंडा नावाचा बहादूरवाडीत रूपांतर झालं.
काळ पुढे सरकत होता.महिपतरावांच्या कार्यकर्तृत्वा मुळे त्यापरिसरात त्यांचा नावाचा दाबजोर बोलबाला होता.घोरपडे घराण्याचा काळ म्हणजे बहादूरवाडीचा सुवर्ण काळच होता. महिपतीराव म्हणजे मोठ्या जमावाची असामी. राजांसाठी बऱ्याच जोखमीच्या मोहिमा लढलेला सरदार. आणि हाच उत्कर्षाचा काळ शेजारच्या सांगलीकर पटवर्धनांना खटकू लागला डोळ्यात खुपु लागला.याच दरम्यान महिपतराव दुसरे यांच्यावर इलख्याची जबाबदारी आली.
हळू हळू स्वार राऊतांमध्ये चकमकी होऊ लागल्या.आणि एक दिवस गोटखिंडीत मोठी गर्दी उसळली.घोरपड्यांची पथकं ही कसलेली होती.पटवर्धनांना घोरपड्यांनी चांगलंच आता येऊन दिलं.जशी फौज खिंडीत शिरली तसा घोरपड्यांनी हल्ल्याचा जोर वाढवला.मोठी दुमसचकरी उडाली. घोरपड्यांच्या रेट्यामुळे सांगलीकर हैराण झाले. बरेच हशम प्यादे पडले. सांगलीकरांचा बाबजी नामक सरदार या लढाईत कामी आला.लढाईच रंगरूप बघून सांगलीकरांची पथके माघे हटू लागली.तसा लढाईचा नुर पार पालटला. घोरपड्यांनी सांगलीकरांची फौज पार उधळून लावली.
याच दरम्यान लढाईत ऐन गर्दीत घोड्यावर स्वार असलेले बाबजी पडले.पडल्यामुळे मांडेखालचा घोडा बिचकला आणि घोरपड्यांच्या गावात म्हणजे बहादूरवाडीत शिरला.फौजेतल्या हशमांनी घोडा धरला आणि महिपतीरावांच्या पुढे हजर केला. जनावर अतिशय जातिवंत आणि देखणं असल्यामुळे ते महिपतरावांच्या मनी भरलं. त्यांनी तो आपल्या खासगी वापरात ठेवला. काळ पुढे सरकत होता.हळू हळू वय होऊन घोडा मरण पावला.सखा सोबती गेल्यामुळे महिपराव कष्टी झाले.त्यांनी त्याची अगदी व्यस्तीत दफन केले.आणि त्या जागेवर त्याचे मोठे सुबक थडगे बांधले.
त्या थडग्यावर घोड्याची प्रतिमा ही कोरण्यात आली होती. त्याला लोक “बाबज्या घोड्याचे थडे” म्हणून संबोधू लागले.
श्री. इंद्रजित खोरे
भोडणी.
ता. इंदापूर जि. पुणे